Edit This Menu

Sunday, September 14, 2014

महाराष्ट्र ई-गर्व्हनन्स

पुस्तकाचे नाव - महाराष्ट्र ई-गर्व्हनन्स

लेखकाचे नाव - सुनील पोटेकर

प्रकाशक - शब्दांजली प्रकाशन -पुणे. (संपर्क - ९२७०१०८०८०)महाराष्ट्र ई-गर्व्हनन्स या पोर्टलवर ‘ई-संस्कृती' या सदरात सुनीलचे महाराष्ट्र राज्यातल्या ई- क्षेत्रात अंमलबजावणी झालेल्या आणि महाराष्ट्र शासनाच्या लोकांसाठीच्या योजना आणि त्यांची सोप्या भाषेतली आवश्यक अशी माहिती सुनील पोटेकरांनी या पुस्तकातून अतिशय सोप्या भाषेत पोहोचवण्याचे काम केलं आहे. भारत सुपर पॉवर झाला पाहिजे आणि भारतानं तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा हा वापर जास्तीत जास्त तळापर्यंत झाला पाहिजे, पोचला पाहिजे. लोकांसाठी, लोकांना उपयुक्त असं जे जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजेच. पण त्याच बरोबर तांत्रिकदृष्ट्या त्यांना आधुनिक तंत्रज्ञान वापरणं, हाताळण अवघड वाटत असेल , तर त्यासाठी त्यांना तयार केलं पाहिजे. त्यांना त्याची सवय लावली पाहिजे. गरज ही शोधाची जननी म्हणतात त्याप्रमाणेच काम व्हायला हवं. मोबाईल आला आणि तो अगदी तळागाळापासून ते डोंगरकपारीपर्यंत सर्वच ठिकाणी जिथे म्हणून माणूस आहे, तिथंपर्यंत जावून पोचला ना! याचं, कारणच तात्काळ स्वाम्दाची गरज तर होतीच, पण तंत्रज्ञानानं ही गोष्ट साध्या करून दाखवली. त्याच प्रमाणे आज सरकारच्या अनेक योजना जनतेसाठी निघतात, नवनवीन योजना तयार होतात, पण त्याची माहिती किती लोकांपर्यंत पोहोचते? किती जण त्या योजनांचा लाभ घेतात? त्यात ही माहिती जरा इंटरनेटवर येऊ पाहत असेल, तर इंटरनेटच मुळी किती लोक वापरतात? मनाला पडणारे हे सगळे प्रश्न खूपच महत्वाचे आहेत. पण त्याच बरोबर इंटरनेट सुविधा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यांनी ते वापरावे यासाठी तळापर्यंतच्या लोकांपर्यंत ई-साक्षरता पसरवणे खूप महत्त्वाचे आहे, आणि ई-साक्षर होत असताना प्रत्येकाला त्या मार्गावरच्या अडचणी दूर करण्यासाठी सुनीलसारखी माणसं विचार करत असतात. सुनीलच्या या पुस्तकाने लोकांचं काम खूपच सोपं झालं आहे. खरोखरचं हे पुस्तक घरोघरी असणं आवश्यक आहे. कारण या पुस्तकातून प्रत्येकाला हवी ती योजना, त्याचे लाभ, त्याची माहिती सारं सारं इंटरनेटवर कसं बघायचं हे सांगितलं आहे, त्यामुळे कम्प्युटरची, इंटरनेटची भीती चमत्कार करावा तशी सुनीलनं पळवून लावली आहे.
    सुनीलच्या पुस्तकात विश्वकोशानं सुरुवात झाली आहे. विश्वकोश कुठल्याही शुल्काविना इंटरनेटवर कसा उपलब्ध आहे आणि तो कसा पाहायचा या विषयीही माहिती हे पान वाचकांना सांगतं. तसंच प्रत्येक व्यक्तीचं आपलं स्वत:चं घर असावं असं स्वप्न असतं. हे स्वप्न पूरम होताना सर्वसामान्य लोकांचा संबंध मुद्रांक आणि नोदंणी कार्यालयाशी येतो. मालमत्तेच्या खरेदी-विक्री संबंधात कागदपत्रांची  नोंदणी प्रक्रिया या ठिकाणी होत असते. आय-सरिता नावाचं त्याचं पोर्टल कसं बघायचं हेही या पुस्तकात समजावून सांगितलं आणि दाखवलं आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यासंबंधीची सर्व माहिती दिलेल्या संकेतस्थळावर मिळू शकते. अपंगासाठीचंही पोर्टल इथे बघायला मिळतं. आधार कार्ड कसं काढायचे? याचीही माहिती इथेच एका पेजवर मिळते. आरोग्याच्या संबंधाबाबत आशा स्वयंसेविका योजना यांच्याविषयी माहिती सांगणारं पानही इथे बघायला मिळतं. ई-रिक्रुटमेंट पासून अनेक कामं या संकेतस्थळाला भेट देऊन कमी वेळात करता येतात व ती कशी करावी याची माहिती कळते. सुनीलने अशा ३० प्रकारच्या योजना, प्रकल्प या पुस्तकातून लोकांसमोर आणल्या आहेत.


महाराष्ट्र टाइम्स दि. 14 - ९-२०१४ मध्ये शब्दांजली प्रकाशनच्या "महाराष्ट्र ई-गर्व्हनन्स " या नव्या पुस्तकाचे स्वागत केले गेले आहे, पुणे आवृत्ती पान नंबर १४. तसेच सकाळ सप्तरंग दिनांक 7/09/2014  मध्ये शब्दांजली प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या महा ई- गव्हर्नन्स या पुस्तकाबद्दल माहिती प्रसिद्ध झालेली आहे.

महाराष्ट्र ई-गव्हर्नन्स 
राज्य सरकारच्या विविध खात्यांत ई-गव्हर्नन्सचे जे प्रयोग राबवण्यात आले, त्यांची माहिती राज्य सरकारच्या सेवेत असलेले आणि संगणकशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले सुनील पोटेकर यांनी या पुस्तकात दिली आहे. सरकारच्या विविध खात्यांत ई-गव्हर्नन्स पद्धतीनं काय बदल झाले, त्यासाठी काय करावं लागलं आणि या सगळ्याचा जनतेला थेट फायदा कसा झाला, याचा आढावा त्यांनी घेतला आहे. या सेवेचा उपयोग कसा करून घ्यायचा, याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. 
प्रकाशक - शब्दांजली प्रकाशन, पुणे (९२७०१०८०८०) /  पृष्ठं - १०४  / मूल्य - १२० रुपये. 

No comments:

Post a Comment